प्र. मी अपॉईंटमेंट कशी बुक करू शकतो?
उ. वेबसाइटचा वापर करुन अपॉइंटमेंट बुक करण्याकरिता कृपया येथे क्लिक करा. त्यानंतर पुढील चरणांचे पालन करा :
अपॉईंटमेंट बुकिंग साठी प्रारंभिक रु २४९ जमा करा.
आपला पत्ता द्या जेथे वैद्यकीय सहाय्यक तपासणीसाठी आपल्याला भेट देईल.
आपल्या अपॉइंटमेंट ची तारीख आणि वेळ निवडा.
आपल्या अपॉइंटमेंट चे पुष्टीकरण मिळवा.
प्र. मी व्हॉट्सअॅपवर अपॉईंटमेंट कशी बुक करू शकतो?
उ. +९१ ७८९ २३८ ७४९८ ह्या फोन नंबर वर व्हाट्सऍप वरून "hi" असा मेसेज पाठवा. त्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट कशी बुक करायची ह्याबद्दल व्हाट्सऍप वरून मार्गदर्शन केले जाईल.
प्र. मी अपॉईंटमेंट कशी रद्द करू शकतो?
उ. आपण अपॉईंटमेंट बुक केल्यावर प्राप्त झालेल्या पुष्टीकरण ईमेलमधील "कॅन्सल अपॉइंटमेंट" लिंक वर क्लिक करू शकता. किंवा आम्हाला व्हाट्सएपवर +९१ ७८९ २३८ ७४९८ ह्या नंबर वर "अपॉईंटमेंट रद्द करा" मेसेज पाठवू शकता. कृपया लक्षात घ्या की रकमेच्या संपूर्ण परताव्यासाठी आपल्या अपॉइंटमेंटच्या आधी 45 मिनिटांपर्यंत आपण ती रद्द करू शकता. अपॉईंटमेंटच्या 45 मिनिटांच्या आत रद्द केल्यास रक्कम परत केली जाणार नाही.
प्र. तुमच्या कडे विनामूल्य फॉलो उप वैद्यकीय सल्ल्याची सोय आहे का?
उ. आम्ही पहिल्या वैद्यकीय सल्ल्याचा तारखेपासून ३ दिवसांपर्यंत मोफत वैद्यकीय सल्ला देतो.
प्र. मी पैसे कसे भरावे?
उ. आम्ही अपॉइंटमेंट ची पुष्टी करण्यासाठी खालील प्रकारे देय रक्कम स्वीकारतो:
क्रेडिट / डेबिट कार्डे
यूपीआय, वॉलेट्स
नेटबँकिंग
प्र. माझ्या औषधांची किंमत अपॉइंटमेंट फी रु २४९ मध्येच समाविष्ट आहेत का ?
उ. नाही. औषधे आणि घरपोच वितरण हे अपॉइंटमेंट फी रु. २४९ मध्ये समाविष्ट नाही. त्याकरिता अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
प्र. मी परतावा कसा मिळवू शकतो?
उ. जेव्हा आपण अपॉइंटमेंट रद्द करता तेव्हा आपल्या परताव्याची स्वयंचलितपणे प्रक्रिया सुरु होते आणि आपल्याला पुढच्या 30 मिनिटांत रिफंड ट्रांझॅकशन ID प्राप्त होईल. आपल्या देयकाच्या मूळ मोडवर आपल्याला आपला परतावा मिळेल.
प्र. परतावा मिळविण्यासाठी किती वेळ लागेल?
उ. तुम्ही अपॉइंटमेंट रद्द केल्यानंतर आम्ही आमच्याकडून ३० मिनिटांत परताव्याची प्रक्रिया सुरु करू. तथापि, बँक, कार्डे आणि पेमेंट प्रोसेसर ज्या पद्धतीने कार्य करतात त्यानुसार, पैसे परत घेण्याच्या पद्धती नेटबँकिंगद्वारे असल्यास त्यास १२ व्यावसायिक दिवसांपर्यंत मिळू शकतो तसेच कार्ड किंवा वॉलेटवर परतावा येण्यास ७ व्यावसायिक दिवस लागू शकतात.
प्र. तुमच्या डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता काय आहे?
उ. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे काही प्रसिद्ध रुग्णालयांमधील रुग्णसेवेचा अनुभव गाठीशी आहे.
एम. डी. किंवा डी. एन. बी. (एम. डी. समान ) पदवीधर अशी किमान शैक्षणिक पात्रता तसेच डी. एम. किंवा फेलोशिप असे पदव्युत्तर उच्च शिक्षण सुध्दा झालेले आहे.